कणकवलीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलात सर्व व्यापाऱ्यांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही : आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकी जागेतील व्यापारी वर्गाने घेतली भेट

कणकवली : कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकी जागेतील व्यापारी वर्गाने सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सोमवारी भेट घेऊन व्यापारी वर्गाच्या विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यापारी बांधवांसोबत दोन तास चर्चा केली. या चर्चेत अनिल मेस्त्री, राजु म्हापसेकर, महेश मेस्त्री, सचिन कुवळेकर, जमिल भाई कुरेशी, प्रभाकर कदम यांनी सहभाग घेतला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नव्याने व्यापारी संकुल उभारणी करताना सर्वच बाबतीत मार्गदर्शन केले, तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलामध्ये सर्वांना समाविष्ट करण्याचा आपण पर्यंत करू अशी ग्वाही दिली.

उपस्थित सर्व व्यापारी बांधवांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना निवेदन सादर केले. या निवेदनात असे म्हटले आहे की, कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे असलेले नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट ( पुर्वी चे भाजी मार्केट) मधील स्लॅब ची इमारत पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर असून, पहिल्या मजल्यावरील भिंती पडल्या आहेत. तसेच एका बाजूने स्लॅब सुध्दा कोसळला असून, इमारत धोकादायक बनली आहे. या मध्ये एकुण १३, पहिल्या मजल्यावर ३ आणि १ पत्रा शेड असे एकूण १७ गाळे धारक आहेत. त्याचप्रमाणे ३६ खोके धारक असून या सर्वांची नगरपंचायत मध्ये नोंद आहे. सर्वजण वेळोवेळी भाडे भरणा करत आहेत, तसेच महसूलच्या जागेत ११ खोके धारक आहेत. त्याचप्रमाणे मागील १० ते १५ वर्षे येथील गाळे भाड्याने घेऊन, जे व्यवसाय करत आहेत, त्यांचाही विचार केला जावा. आपण प्रत्यक्षात पाहणी करून लवकरात लवकर या जागेवर नवीन व्यापारी संकुल उभारणी करावे, आणि आम्हाला नवीन व्यापारी संकुलामध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आज आम्ही नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन दिले, तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली होती. सर्व व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसांत पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहोत, असे सांगितले. यावेळी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी सौ. ऋणाली राजेंद्र पेडणेकर, भगवान कासले, राम सुर्यवंशी, महेश वायगंणकर, प्रभाकर कदम, प्रसाद पाताडे, अविनाश गावडे, बाबुराव घाडीगावकर, जाधव, नुरूभाई, निखार्गे , महाडिक, भारती फाटक आदी बहुसंख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!