चिवला बीचवर स्वच्छता मोहिम ; ५०० किलो कचरा संकलित

आरोग्य सभापती पूनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्यासह पालिका कर्मचारी व लायन्स सदस्यांची उपस्थिती

मालवण : मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांच्या आदेशान्वये व बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथील चिवला बीचवर मंगळवारी सकाळी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला.

आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या सहभागाने ही मोहीम पार पडली. यावेळी लायन्स क्लबचे सदस्य, मालवण नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

चिवला बीच परिसरातील प्लास्टिक, कचरा व इतर घाण गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समुद्रकिनारा स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश दिला. स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर मालवण या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे चिवला बीच परिसराला स्वच्छ आणि सुंदर स्वरूप प्राप्त झाले.

error: Content is protected !!