नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल महेश इंगळे यांचा भाजप नवी मुंबईचे उपाध्यक्ष गणेश कमळे यांच्यावतीने सत्कार

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे हे अलीकडेच सलग सहाव्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल त्यांचा भाजप नवी मुंबईचे उपाध्यक्ष गणेश कमळे परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये संपन्न झाला.

यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने ही गणेश कमळे व कुटुंबीयांचाही श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन नगरसेवक महेश इंगळे यांनी सन्मान केला. यावेळी नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा राजश्री कमळे, समाजसेविका आरती सगर, पूजा शेट्टी, विहान शेट्टी, मेघा भूतांनाल यांचा सत्कार झाला. स्वामींच्या दर्शनानंतर श्री महेश इंगळे यांचा श्रीफळ, शाल आणि स्वामींच्या गळ्यातील हार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचे कौतुक केले आणि नगरसेवकपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!