मालवणात उद्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळा
श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन, मत्स्यव्यवसाय कार्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे आयोजन
कुणाल मांजरेकर
मालवण : श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन, मत्स्यव्यवसाय कार्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळा” रविवारी ६ मार्च रोजी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी खुल्या समुद्रातील पिंजरा मत्स्य संवर्धन, समुद्री शेवाळ संवर्धन, शिंपले संवर्धन, शोभिवंत मत्स्यपालन, मोठया आकाराचे RAS कप, बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन आणि प्रकल्पासाठी अर्थसहाय्य मार्गदर्शन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सकाळी ९.३० ते १० वा. – नोंदणी आणि चहापान होणार असून सकाळी १० वा. उद्योजक निलेश घाटकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ वा. पहिल्या सत्रामध्ये प्रभारी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त रविंद्र मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षण अधिकारी प्रदीप सुर्वे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना यावर मार्गदर्शन करणार असून दुपारी ३ ते ५ वा. दुसऱ्या सत्रात विषेश अतिथी म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे चंद्रशेखर पुनाळेकर तसेच FSTO चे व्यवस्थापक तथा स्टेट बँक ऑफ इंडिया, पणजीचे प्रशासकीय अधिकारी परमेश्वर नवघरे, स्टेट बँक ऑफ इंडिया कुडाळचे शाखाधिकारी तथा जिल्हा समन्वयक विनायक कुर्हाडे हे अर्थसहाय्य योजनेसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर चर्चासत्र होणार आहे. या कार्यशाळेसाठी १००/- रुपये प्रवेश शुल्क आहे. तरी जास्तीत जास्त नवउद्योजकांनी कार्यशाळेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशनचे सचिव भालचंद्र राऊत आणि प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळेचे समन्वयक राजेश साळगावकर यांनी केले आहे.