‘मोबाईलपासून दूर राहा, खेळातून बुद्धिमत्ता वाढवा’ ; कृतीतून संदेश!

भाजप नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांच्याकडून दांडी शाळेला इनडोअर गेम्सची भेट

मालवण : भाजप नगरसेविका तथा मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या स्थानिक प्राधिकरण सदस्य सौ. अन्वेषा आचरेकर यांनी दांडी शाळेला विविध प्रकारचे इनडोअर गेम साहित्य तसेच शैक्षणिक साहित्य भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासाला हातभार लावला.

यावेळी आचरेकर यांनी शाळेला स्टँडसह कॅरम बोर्ड, चेस बोर्ड, लुडो-सापशिडी, इंग्लिश स्पेलिंग किट आदी दर्जेदार इनडोअर गेम साहित्य भेट दिले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून आपली बौद्धिक पातळी वाढवावी, तसेच मुलांना सामूहिकरीत्या एकमेकांच्या संपर्कात जोडून ठेवण्यासाठी समूहाने खेळ खेळणे गरजेचे आहे. याच उद्देशाने दांडी शाळेला हे गेम साहित्य भेट देण्यात आले, असे सौ. अन्वेषा आचरेकर यांनी सांगितले.

शाळेबद्दल असणारी सौ. आचरेकर यांची ओढ आणि सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल दांडी शाळेच्या शिक्षकवृंदाकडून त्यांचे आभार मानण्यात आले. या प्रसंगी दांडी शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मालंडकर, उपाध्यक्ष धुरी, सर्व शिक्षिका, पालकवर्ग,तसेच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका महानंदा खानोलकर, तारका चव्हाण, अमृता फाटक, दीक्षा गावकर, महिमा मयेकर आदी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!