पं. स. आरक्षण : मालवण तालुक्यात मातब्बरांना धक्के ; नवीन चेहऱ्यांना संधी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आरक्षण सोडत आज येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. या सोडतीत अनेक मातब्बरांना धक्के बसले असून अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
मालवण तहसील कार्यालयात प्रांताधिकारी वंदना खरमाळे आणि तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी कु. कौशल प्रतिक जाधव या मुलाच्या हातून चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, अजिंक्य पाताडे, संतोष कोदे, अशोक बागवे, शशांक कुमठेकर, विजय केळुसकर, मोहन कुबल, विलास खिलाफे आदी उपस्थित होते.
मालवण पं. स. चे आरक्षण
अनुसुचित जाती महिला – आडवली-मालडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग – (महिला) – शिरवंडे, मसुरे- मर्डे, नागरिकांचा मागास प्रवर्ग – सुकळवाड,
सर्वसाधारण (महिला) : पेंडूर, चिंदर, कोळंब, वराड
सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) : चौके, कुंभारमाठ, आचरा, पोईप, गोळवण, वायरी-भूतनाथ