घटनास्थळी भेट देत केली पाहणी; कांदळगावकर कुटुंबीयांना दिला धीर
मालवण : तारकर्ली येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी जळीत बोट दुर्घटनेची गंभीर दखल घेत ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेमुळे संकटात सापडलेल्या कांदळगावकर कुटुंबीयांची भेट घेत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. तसेच ठाकरे शिवसेनेच्या वतीने पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
या दुर्घटनेमुळे संबंधित कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून, अशा कठीण प्रसंगी पीडितांच्या पाठीशी उभे राहण्याच्या भूमिकेतून ठाकरे शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला. या पाहणी दौऱ्यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, पूजा करलकर, राधिका मोंडकर, उमेश मांजरेकर, राजू मेस्त्री, गुंडू कांदळगावकर, राजाराम खराडे, अनिल टिकम, पप्पू चिंदरकर, दीपक लोणे, प्रभाकर राझम, अनिल केळुसकर, शाखाप्रमुख आबा केळुसकर, यतीन झाड यांच्यासह स्थानिक नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.