खा. नारायण राणेंच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतोय ५ जी नेटवर्कचा विस्तार

खा. राणेंच्या मागणी पत्रानंतर सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी ५ जी टॉवर मंजूर ; बीएसएनएल कडून मंजूर मोबाईल टॉवरची यादी जाहीर

कणकवली : भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी ५ जी मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कडून या मंजुरीची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.

यात देवगड तालुक्यातील हिंदळे, कुणकवन, महाळुंगे, मोंड, फणसगाव, पोयरे, तळवडे, तांबळडेग, तिरलोट-दाभोळे कातकरवाडी, विठ्ठलादेवी, वेळगिवे अशी गावे आहेत. तर दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे गावात टॉवर मंजूर झाला आहे. कणकवली तालुक्यात ओटव, फोंडाघाट, कुडाळ तालुक्यात कालेली, कुसगाव या गावांसाठी टॉवर मंजूर झालेले आहेत. मालवण तालुक्यात बागवाडी, धामापूर, निरोम, राठिवडे, सावंतवाडी तालुक्यात पडवे, माजगाव, सातोळी तर्फ सातार्डा,तांबोळी या गावांना टॉवर मंजूर झालेले आहेत तर वैभववाडी तालुक्यातभोम, जांभवडे, मौंदे, नाणिवडे, तिरवडे तर्फ खारेपाटण, तिरवाडे तर्फ सोंदळ या ठिकाणी टॉवर मंजूर झालेले आहेत तर वेंगुर्ले तालुक्यातसाखेलेखोल,टांक असे बीएसएनएलचे टॉवर मंजूर झालेले आहेत.

error: Content is protected !!