कुडाळ : आमदार निलेश राणे आणि राणेकुटुंबाच्या वतीने गेली १६ वर्षे कुडाळात “सिंधुदुर्गचा राजा” सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना करण्यात येते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार म्हणून निवडून येण्यासाठीचा नवस भाविकांनी केला होता. भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या सिंधुदुर्ग राजाने हे मागणे मान्य करत निलेश राणे यांना कुडाळ – मालवण मतदारसंघाचे आमदार म्हणून विजयी केले. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचा राजा प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी या गणरायाला सोन्याचे पाऊल अर्पण करून हा नवस फेडला. शहरातील प्रतिष्ठित डॉ. जी. टी. राणे यांच्याहस्ते ही प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.


कुडाळ येथे गेली १६ वर्ष राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना होत आहे. यावर्षी नारायण राणे हे खासदार, निलेश राणे हे आमदार तर नितेश राणे पालकमंत्री म्हणून कार्यरत असल्याने यावर्षी या गणेशोत्सवाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी कार्यकर्त्यांनी नवस केला होता की, निलेश राणे आमदार झाले तर सिंधुदुर्ग राजाचे पाऊल सोन्याचे बनवले जाईल. भक्तांच्या हाकेला सिंधुदुर्ग राजा पावला त्यामुळे हा नवस यावर्षी फेडण्यात आला सिंधुदुर्ग राजाच्या चरणी आमदार निलेश राणे यांनी सोन्याचे पाऊल अर्पण केले हे पाऊल राकेश नेमळेकर यांनी गणरायाला परिधान केले. तसेच सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना प्रतिष्ठित डॉ. जी. टी. राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, ओंकार तेली, जिल्हा परिषद माजी सभापती प्रितेश राऊळ, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहर प्रमुख अभी गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, तालुका सरचिटणीस राकेश कांदे, रचना नेरुरकर, रेवती राणे, राजेंद्र राणे, नागेश नेमळेकर, भूषण राणे, प्रसन्ना गंगावणे, बाळा कुडाळकर, संजू नेमळेकर, नागेश नेमळेकर, विनायक घाडी उपस्थित होते. सिंधुदुर्ग राजाचे हे सोन्याचे पाऊल शहरातील सुवर्णकार राजू पाटणकर यांनी केले आहे

Subscribe to my channel




