मालवण : मालवण शहर धुरीवाडा कुरण येथील हायमास्ट गेले काही दिवस बंद होता. यामुळे मच्छिमार व व्यावसायिक यांना अडचणी निर्माण होत होत्या. गणेश चतुर्थी उत्सव लक्षात घेता हा हायमास्ट टॉवर दुरुस्ती करून सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. याबाबत माहिती मिळताच शिवसेना शहर प्रमुख तथा कार्यसम्राट माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी इलेक्ट्रिशन बोलावून नेमकी समस्या जाणून घेतली. येथील केबल जळून गेल्याने ती बदलणे आवश्यक होते. दिपक पाटकर यांनी जळालेली केबल नवीन बसवून देत गणेश चतुर्थी उत्सवात हायमास्ट प्रकाशमान करून दिला. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं असताना जनसेवा हेच आपले पाहिले कर्तव्य या भावनेतून काम करण्याचा व नागरिकांना सेवा देण्याचा आपला प्रयत्न आहे. यात सर्व स्थानिक पदाधिकारी यांचेही सहकार्य असल्याचे दिपक पाटकर यांनी सांगितले. यावेळी आबा शिर्सेकर, शिवाजी केळूसकर, वसंत गांवकर, बाबु धुरी, तुळशिदास गोवेकर, दत्ता केळुसकर, एकनाथ मोहिते, मिथुन मणचेकर, दादू शिर्सेकर, पवन शिर्सेकर, संदीप धुरी व धुरीवाडा मच्छिमार, नागरिक यांनीही आभार मानले.