मालवण नगरपालिका निवडणूक : नगरसेवक पदासाठी आज १२ अर्ज दाखल

शिवसेना उबाठाचे सर्वाधिक ८, काँग्रेसचे २ तर भाजपच्या एका उमेदवाराचे नामनिर्देशन : नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज नाही

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी १२ जणांचे नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सर्वाधिक ८ जणांनी आपले अर्ज दाखल केले असून काँग्रेसच्या वतीने दोघांनी अर्ज भरले. भाजपच्या वतीने एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. तर एका अपक्षाने अर्ज भरला आहे.

उबाठाकडून माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, स्मिता सरमळकर, पूजा जोगी, गौरी मयेकर, निलेश दुधवडकर, तपस्वी मयेकर यांनी तर काँग्रेस कडून रुपाली सकपाळ, संदेश कोयंडे यांनीही महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दाखल केली. भाजप कडून पंकज सादये तर अपक्ष म्हणून श्वेता सरमळकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी ठाकरे शिवसेना व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

error: Content is protected !!