चिवला बीच समूलबाग परिसरातील वीज समस्येला पूर्णविराम

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरची उभारणी; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

मालवण : चिवला बीच येथील समूलबाग परिसरातील कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या आता मार्गी लागली आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून या परिसरात नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला आहे. या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

गेल्या काही काळापासून परिसरातील नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत होता. नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यामुळे या समस्येवर तोडगा निघण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार निलेश राणे यांचे आभार मानले.

या लोकार्पण सोहळ्याला मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, नगरसेविका अश्विनी कांदळगावकर, सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेविका भाग्यश्री मयेकर, नगरसेवक ललित चव्हाण, उद्योजक मोहन वराडकर, राजन परुळेकर, भाई मांजरेकर, अखिलेश शिंदे, निकीत वराडकर, रुजाय फर्नांडिस, गणेश चिंदरकर, विजय केळूसकर, विनोद शंकरदास, संजय कांदळगावकर, सुधीर कांदळगावकर, उदय परब, विनायक रेडकर, प्रदीप मयेकर, रुपेश कांबळी, हर्षद सावंत, संतोष सावंत, राहुल किर, चंदन मयेकर, संतोष परब, मनोज शिरोडकर, राजा वालावलकर, प्रितम शिंदे तसेच वीज कर्मचारी भालचंद्र वस्त यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!