वराड गावात वृद्ध, अपंग, निराधारांची दिवाळी गोड होणार ; निलेश राणेंच्या हस्ते मदतीचा हात …!

भाजपा शक्ती प्रमुख प्रमुख राजन माणगांवकर यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालूक्यातील वराड गावात वृद्ध, निराधार आणि अपंगांची दिवाळी गोड होणार आहे. येथील भाजपाचे शक्ती केंद्र प्रमुख राजन माणगांवकर यांच्या संकल्पनेतून भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते गावातील श्रावणबाळ वृद्धापकाळ, अपंग आणि निराधार व्यक्तींना वस्तू स्वरूपात ‘दिवाळी भेट’ वितरण रविवारी करण्यात आले.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे सण उत्सव यासह सर्वकाही ठप्प होते. यावर्षी सर्वकाही सुरळीत झाले आहे. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबीय यांच्या घरातील दिवाळीही आनंदात साजरी व्हावी या हेतूने वराड गावात भाजप शक्तिकेंद्र प्रमुख राजन माणगांवकर यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ९५ व्यक्तीना दिवाळी भेट देण्यात आली.

वराड ग्रामपंचायत येथे रविवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जि. प. चे माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच सीताराम मिठबावकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, वराड पंचायत समिती शक्ती केंद्र प्रमुख राजन माणगांवकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, गाव कमिटी अध्यक्ष बबन पांचाळ, माधुरी मसुरकर, रसिका राजन माणगांवकर, बूथ कमिटी अध्यक्ष अजय चव्हाण, हनुमान सरमळकर, मोहन मसुरकर, दादा नाईक, चंद्रशेखर वराडकर, दत्ताराम परब यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

वराड गावात भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मागील काळात मोठ्या प्रमाणात विकास झाला. मात्र गेल्या काही वर्षात विकास खुंटला होता. रस्ते, जोडरस्ते, तलाव, पूल आदी प्रश्न प्रलंबित राहिले. हे प्रश्न आपण राज्य सरकारच्या माध्यमातून प्राधान्याने सोडवावेत, अशी मागणी संतोष साटविलकर, राजन माणगांवकर, बबन पांचाळ यांनी ग्रामस्थांच्या वतीने निलेश राणे यांच्याकडे केली. दरम्यान गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून रखडलेला विकास नव्या सरकारच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्याची ग्वाही निलेश राणे यांनी ग्रामस्थांना दिली. दरम्यान संतोष साटविलकर व राजन माणगांवकर यांच्या सामाजिक व विकासाभिमुख कामाचे निलेश राणे यांनी विशेष कौतुक केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!