मालवण एसटी आगाराला ५ जिजाऊ बसेस प्राप्त

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा

मालवण : मालवण बसस्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बसेस रविवारी दाखल झाल्या आहेत. आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून या बसेस उपलब्ध झाल्या असून यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा एसटीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. यापुढे मालवण आगाराला आणखीही नव्या बस प्राप्त होणार आहेत.

error: Content is protected !!