दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदर गावात १४ नव्हे तर १६ विकासकामे स्वखर्चाने!

शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांनी पं. स. सदस्य दिपक सुर्वे यांना दिली कामांची यादीच : गटनेते पदाचाच नाही तर पं. स. सदस्यत्वाचाच राजीनामा द्या

१५ लाख शासन निधीतून स्वतःच्या एका घराकडे जाण्यासाठी रस्ता बनवणाऱ्या दीपक सुर्वे यांना जनतेशी काहीच देणे घेणे नसल्याची टीका

चिंदर गावात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी केलेल्या कामाची माहिती वाडीवस्तीतील जनताच सुर्वे यांना देईल

मालवण | कुणाल मांजरेकर

चिंदर गावातील विकास कामांवरून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यावर नाहक टीका करुन त्यांच्याकडे कामांची यादी मागणाऱ्या भाजपचे स्थानिक पं. स. सदस्य व गटनेते दीपक सुर्वे यांना शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना चिंदर गावातील १४, नव्हे तर १६ विकास कामांची यादीच दिली आहे. चिंदर गावात वाडी वस्तीवरील जनतेची मागणी आणि गरज लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चिंदर गावात विकासकामांचा झंझावात निर्माण करत एकाचवेळी ही कामे पूर्ण केली असून यामुळेच येथील जनतेसाठी काहीच न करणाऱ्या पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच अकलेचे तारे तोडण्याचे व जनतेला दिशाभूल करण्याचे काम ते करत आहेत. मात्र आता जनताच यांना जाब विचारणार असून स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी १५ लाखाचा शासन निधीचा हिशोब सुर्वे यांना जनतेला द्यावाच लागेल. अन्यथा पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा जनताचा यांच्याकडून मागणार आहे, असा हल्लाबोल संतोष कोदे यांनी केला आहे.

जर माझ्या चिंदर गावात दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून १४ विकास कामे केली असतील तर मी माझ्या पंचायत समिती गट नेता पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. अन्यथा दत्ता सामंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दयावा. असे आव्हान चिंदर पंचायत समिती सदस्य तथा मालवण पंचायत समिती भाजपा गटनेते दिपक सुर्वे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिले होते. याला उत्तर देत शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांनी चिंदर गावात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी १४ नव्हे तर प्रगतीपथावर असलेल्या दोन कामांसह झालेल्या एकूण १६ विकासकामांची यादीच सादर केली. तसेच दिपक सुर्वे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. केवळ स्वतःचा विकास हेच लक्ष असणाऱ्या आणि स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी शासनाचा १५ लाख निधी खर्च करणाऱ्या दिपक सुर्वे यांना गावातील जनतेच्या विकासाशी देणेघेणे नाही. असाही घणाघात संतोष कोदे यांनी केला.

१६ विकास कामांची यादी जाहिर

चिंदर तेरई रस्ता डांबरीकरण करणे, चिंदर लब्देवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे, चिंदर कावले घर लब्देवाडी रस्ता तयार करणे, चिंदर लाटमवाडी रस्ता डांबरीकरण करणे, चिंदर सडेवाडी गोसावीवाडी गणेश घाट कडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे,चिंदर सडेवाडी देवकोंड वाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे,चिंदर सडेवाडी स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण करणे,चिंदर सडेवाडी येथे स्मशानशेड बांधणे,चिंदर मुळे घर रस्ता मजबुतीकरण करणे,चिंदर गावडेपुरुष रस्ता डांबरीकरण करणे,चिंदर बागवाडी रस्ता मजबुतीकरण करणे,चिंदर कुंभारवाडी स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण करणे,चिंदर कुंभारवाडी येथे गणेश घाट बांधणे/सुशोभीकरण,चिंदर सडेवाडी गोसावीवाडी घागरे घर रस्ता तयार करणे,चिंदर मसुरकरवाडी महापुरुष पार बांधणे,चिंदर पालकरवाडी पाटणवाडी येथे एस.टी. वाहतुकीस अडथळा होणारा विदयुत पोल तात्काळ बदलून दिला. जनतेची गरज आणि हिताच्या दृष्टीने ही कामे करण्यात आली, असे संतोष कोदे यांनी सांगितले.

गटनेते पदाचाच नव्हे तर सदस्य पदाचाही राजीनामा दिपक सुर्वे यांनी द्यावा

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी पुर्ण केलेल्या चिंदर गावातील 16 विकासकामांची यादी आम्ही जाहिर केली. जनतेसोबत यां कामाच्या ठिकाणी जावून पाहाणी करावी. त्या त्या वाडीतील जनताच सांगेल कामे कोणी केली. वास्तव डोळ्यासमोर असताना केवळ आपले अपयश लपवण्यासाठी दिपक सुर्वे अकलेचे तारे तोडत आहे. त्यामुळे गटनेते पदाचाच नव्हे तर पंचायत समिती सदस्य पदाचाही राजीनामा दिपक सुर्वे यांनी द्यावा. असे खुले आव्हान संतोष कोदे यांनी दिले आहे.

ग्रामस्थांच्या घराकडे रस्ता नाही मात्र तुमच्या घराकडे रस्त्यासाठी १५ लाख निधी

चिंदर गावातील अनेक वाडीत ग्रामस्थ यांच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता नाही त्याकडे दिपक सुर्वे यांचे लक्ष गेले नाही. मात्र स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी 15 लाख शासन निधी खर्च करून रस्ता करून घेत असताना तुम्हाला चिंदर गावातील जनतेची आठवण नाही आली. वा रे तुमचे समाज कार्य. याचे उत्तर तुम्हालाजनतेला द्यावेच लागेल.

तुमचे आणि तुमच्या सहकाऱ्यांचे कारनामे अनेक आहेत, मात्र तूर्तास एवढेच पुरे

दिपक सुर्वे तुमचे आणि तुमच्या सोबत असणाऱ्यांचे कारनामे अनेक आहेत. योग्यवेळी सर्वकाही जनतेसमोर ठेवले जाईल. आम्हाला गावात राजकारण करायचे नाही. आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून आम्हाला गावचा विकास आणि जनतेची सेवा करायची आहे. जनतेला अपेक्षित चिंदर गावच्या गतिमान विकासासाठी आम्ही कटीबद्ध राहणार. असे संतोष कोदे यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!