आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक ; सुकळवाड गावच्या शिरपेचात मानाचा तुरा
मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड गावची सुकन्या तसेच आंबोली सैनिक स्कुलची विद्यार्थिनी कु. दुर्वा निलेश बांदेकर हिने नेपाळ काठमांडू येथे पार पडलेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावीले. तिच्या या नेत्रदीपक यशामुळे सुकळवाड गावाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला असून दुर्वा हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नेपाळ काठमांडू याठिकाणी नुकतीच १७ वी NSKA आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मालवण सुकळवाड गावची कन्या कु. दुर्वा निलेश बांदेकर हिने नेत्रदीपक यश प्राप्त केले. कु. दुर्वा बांदेकर ही आंबोली येथील सैनिक स्कुल येथे सहावी मध्ये शिकत आहे. आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत तिने भारताचे नेतृत्व केले. तिला या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. सुकळवाड बाजारपेठ येथील निलेश बांदेकर, सौ. नूतन बांदेकर यांची दुर्वा ही कन्या आहे. तिच्या या उज्वल यशा बद्दल सुकळवाड पंचक्रोशी तसेच सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.