नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, सिद्धार्थ जाधव यांचीही उपस्थिती ; शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन


मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपरिषद निवडणुकीला रंगत चढू लागली आहे. प्रभाग ४ मध्ये शनिवारी शिवसेनेचा भगवा झंझावात पाहायला मिळाला. कुडाळच्या नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. याठिकाणी प्रभाग ४ ब मधून शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख सौ. पूनम नागेश चव्हाण या स्वतः निवडणूक लढवत असून उच्चशिक्षित उमेदवार म्हणून आपल्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी विश्वासाने सांगितले. प्रभाग ४ ब मधून आपल्यासह शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर व प्रभाग ४ अ नगरसेवक पदाचे उमेदवार सिद्धार्थ जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सौ. पूनम चव्हाण यांनी मतदारांना केले आहे.
प्रभाग क्रमांक ४ ब च्या शिवसेना उमेदवार पूनम चव्हाण यांनी आपल्या प्रभागात प्रचार फेरी काढली. प्रत्येक घरात जाऊन प्रभागाबद्दल असणारे व्हिजन त्या सांगत आहेत. सायंकाळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांच्यासमवेत काढलेल्या प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. घरोघर जाऊन मतदारांची भेट घेत असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवसेना उमेदवार पूनम चव्हाण यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, कुडाळच्या नगरसेविका चांदणी कांबळी, यशवंत गावकर, नागेश चव्हाण, छोटू ठाकूर, बाबू परब, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Subscribe to my channel




