पोलिसांच्या बोलेरो कारने दुचाकीला उडवले

दुचाकीस्वाराचा मृत्यू : सुकळवाड बाजारपेठ येथील दुर्घटना

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण येथून कसालच्या दिशेने जाणाऱ्या पोलिसांच्या बोलेरो कार (क्र. एम एच ०७ एएस ०९६१) ने समोरून येणाऱ्या हिरो डुएट दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात जगदीश तुकाराम मांजरेकर (वय सुमारे ४५ रा. सुकळवाड भंडारवाडी) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सुकळवाड येथे घडली.

बोलेरोयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल हमरस्त्यावर सुकळवाड बाजारपेठ वरचानाका येथे दुचाकी व चारचाकी या वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात सुकळवाड भंडारवाडी येथील स्थानिक रहिवासी जगदीश तुकाराम मांजरेकर वय अंदाजे ४५ वर्ष हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता तो मृत असल्याचे घोषित करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. जगदीश हा त्याच्या घरात एकुलता एक कमावता मुलगा होता. आई वडील वयस्कर असून भाऊ आजारी असतो. त्यामुळे कुटुंबाला जगदीशचा आधार होता. त्याच्या जाण्याने मांजरेकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून त्यांचा आधार हरपला आहे. ही दुर्घटना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील घटनास्थळी दाखल झाला होता.

error: Content is protected !!