सत्तेत असूनही सरकारच्या चुका दाखवून देणे सोपे नाही, त्यासाठी हिंमत लागते
मालवण | कुणाल मांजरेकर
कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात स्वतःची छाप पाडली आहे. यंदाच्या अधिवेशनात देखील आ. निलेश राणे यांनी त्यात सातत्य ठेवले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी सत्तेतील आमदार असून देखील मंत्र्यांना घाम फोडण्याच्या आम. निलेश राणे यांच्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते आमदार निलेश राणे यांनी देखील जाहीर कौतुक केले आहे.
याबाबत आपल्या एक्स अकाउंट वर केलेल्या पोस्ट मध्ये आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “वस्तुस्थिती मांडायला तळमळ आणि संवेदना लागते, आ.नीलेशजी राणे कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना तीच तळमळ आणि संवेदना दिसून आली. सत्तेत असूनही सरकारच्या चुका दाखवून देणे सोपे नाही, त्यासाठी हिंमत लागते. त्यामुळे आ.नीलेशजी राणे यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आज शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आहे, त्यामुळे पक्ष बाजूला सारून कोणतीही भीती न बाळगता वस्तुस्थिती सरकारच्या नजरेस आणून देणे तसेच गरज पडल्यास अन्नदात्यासाठी सरकारला धारेवर धरणे सुद्धा आवश्यक आहे.”