पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा सुरेश प्रभूंनी केला सत्कार
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुढीपुर कुडाळ गावचे सुपूत्र परशुराम गंगावणे यांचा मंगळवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर दिल्ली येथे माजी केद्रीय मंत्री खा. सुरेश प्रभू यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ कलावंत परशुराम गंगावणे यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. कोकणात कुडाळ जवळ पिंगुळी गुढीपुर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकाहून अधिक काळ त्यांनी आदिवासी लोककलांचे जतन आणि संवर्धन केले आहे. श्री. गंगावणे यांनी खासदार सुरेश प्रभू यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली. यावेळी खा. प्रभू यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारचे अधिकारी उपस्थित होते.