
सरचिटणीस पदी नचिकेत पवार : मालवण शाखा नूतन कार्यकारणीची निवड
मालवण : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणची सन 2026 ते 2028 या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यात अध्यक्षपदी रविकांत कदम तर सरचिटणीसपदी नचिकेत पवार यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजु व शंकर कदम उपस्थित होते. मालवण तालुका शाखेच्या नूतन कार्यकारणीत कोषाध्यक्ष – प्रकाश पवार, कार्यालयीन सचिव- शंकर कदम, हिशोब तपासणीस – वैभव कदम, उपाध्यक्ष(संस्कार विभाग)- सूर्यकांत कदम, उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन विभाग) – संग्राम कासले, उपाध्यक्ष (संरक्षण विभाग)- योगेश वराडकर, सचिव (संस्कार विभाग) – सचिन कासले, मिलिंद पवार, सचिव (प्रचार व पर्यटन विभाग)- संदीप कदम, संकेत पेंडूरकर, सचिव (संरक्षण विभाग)- गणेश कासले, अमोल तळगावकर. संघटक – राजेंद्र जाधव, विशाल डिकवलकर, भरत पेंडुरकर, गौरव जंगम, भिवा तळगावकर यांचा समावेश आहे.
यावेळी मावळते अध्यक्ष, सरचिटणीस व संपूर्ण कार्यकारिणी यांनी गेल्या 2 वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामाचे सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले तसेच जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, संजय पेंडुरकर, शिवप्रसाद चौकेकर, आर. डी. चेंदवणकर, विलास वळंजू व शंकर कदम यांनी नूतन कार्यकारणीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस नचिकेत पवार व कोषाध्यक्ष प्रकाश पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने मार्गक्रमण करणार असल्याचे सांगितले.






Subscribe to my channel






