भाजप महिला आघाडीच्या वतीने मालवणात आयोजित महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धेत वृतिका कोयंडे विजेत्या

लकी ड्रॉ मध्ये अश्विनी जोशी सोन्याच्या नथीच्या मानकरी ; स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : नारळी पौर्णिमेचं औचित्य साधत भारतीय जनता पार्टी मालवण शहर महिला आघाडीच्या वतीने येथील बंदर जेटी येथे महिलांसाठी आयोजित नारळ लढविणे स्पर्धेत दांडी येथील वृतिका कोयंडे विजेत्या ठरल्या. त्यांना रेफ्रिजरेटर देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अशोक सावंत, बाबा परब, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, दीपक पाटकर, भाजप महिला शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, सौ. निवेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत द्वितीय विजेत्या मनीषा पराडकर यांना वॉशिंग मशीन, तृतीय विजेत्या गार्गी सोनवडेकर यांना फॅन बक्षीस देस मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

लकी ड्रॉ मध्ये द्वितीय क्रमांक विजेत्या लतिका शिर्सेकर यांना कुंकवाचा करंडा, तृतीय क्रमांक विजेत्या सुलक्षणा वर्मा यांना चांदीचा छल्ला बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

error: Content is protected !!