भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक …

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे प्रतिपादन ; भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे उदघाट्न

मालवण : देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाने सलग तेरा वर्षे भजन सेवेतून देवीची आराधना आणि आशीर्वाद मिळविलेले आहेत. परमेश्वर भेटीचा आनंद भजनात तल्लीन होणाऱ्या भाविकांना होत असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरणार आहे. परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी भजनसेवा ही एक अत्यानंद मिळवून देणारी आहे. नाभिक समाज बांधवांची एकी आणि त्यातून निर्माण होत असलेले उत्सव यामुळे त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असताना आपल्याला आपल्या गावातीलच उत्सव असल्याचे वाटत आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी केले.

मालवण बाजारपेठेतील संतसेना महाराज मार्गावरील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण होते. दसऱ्याला २ ऑक्टोबर रोजी सोहळ्याचा समारोप होणार आहे. प्रास्ताविकात अॅड. पलाश चव्हाण यांनी भैरवी मंदिरच्या उभारणीचा व भजन महोत्सव आयोजनाचा आढावा घेतला. स्वागत भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण व नाभिक समाजाचे माजी तालुकाध्यक्ष विजय शिवा चव्हाण यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, उद्योजक नितीन तायशेटे, उद्योजक विजय केनवडेकर, नाभिक समाज नेते विजय सिताराम चव्हाण, जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, स्मृती कांदळगावकर, उद्योजक अनिल मालवणकर, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते. बुवा केतन आजगावकर यांचा तसेच गोमाता रक्षणासाठी मोफत वकिली सेवा बजावणारे अॅङ पलाश चव्हाण यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात आला.

शहरात असलेल्या या मंडळाच्या उपक्रमांची माहिती पाहून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि पुढच्या पिढीसाठी नवीन दिशा देण्यासाठी उभे केलेले काम दिसत आहे. मंदिर सुशोभिकरणासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य आपण करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. सुदेश आचरेकर यांनी मंडळ नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी आयोजित करून नामांकीत भजनीबुवांना मंदिरात आणून त्यांच्याकडून देवीची भजनरुपी सेवा करून घेते. त्याचा फायदा सर्व समाजाला होत असल्याने मंडळाचे कार्य गौरवास्पद असल्याचे सांगितले. विजय केनवडेकर यांनी मंडळाचे कार्यकर्ते दिशादर्शकपणे कार्यरत असून आपण त्यांच्या पाठिशी सदैव राहणार आहोत, असे सांगितले. संगीत आणि नामस्मरण हे माणसाच्या जीवनातील महत्वाचे भाग आहेत. भैरवी मित्रमंडळ संगीत आणि नामस्मरणात दोन्ही ठिकाणी आपल्या दर्जेदार उपक्रमातून पुढाकार घेत आहे. यामुळे या मंडळाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण म्हणाले. मंडळाने कधीही आपल्याकडे बिनधास्तपणे येऊन हक्काचे काहीही मागावे. त्यांच्यासाठी मी सदैव एक पाऊल पुढे टाकणार आहे, असे नाभिक समाज नेते वीजय चव्हाण म्हणाले.

सूत्रसंचालन अॅड. पलाश चव्हाण यांनी केले. महोत्सव यशस्वीतेसाठी राजन सकपाळ, उदय चव्हाण, रोहन चव्हाण, कांता चव्हाण, उत्तम चव्हाण, ललीत चव्हाण, हेमंत चव्हाण, किशोर चव्हाण, बाली चव्हाण, लवू चव्हाण, दिलीप वायंगणकर, उद्देश चव्हाण, जगदिश वालावलकर, कौशल वस्त, जयेश कुबल तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी मुकेश बावकर आणि अमीत खोत यांनी विनामुल्य सहकार्य केले.

हरी खोबरेकर व आतू फर्नांडिस मित्रमंडळाचा सत्कार

मालवण बंदरजेटी याठिकाणी गणपती विसर्जन करण्यासाठी हरी खोबरेकर व आतू फर्नांडिस मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी दीड, पाच, सात, नऊ, दहा आणि अकरा दिवसांच्या गणपतींसाठी मोफत गणपती विसर्जन सेवा उपलब्ध करून दिली होती. समुद्राला मोठी भरती असतानाही आपला जीव धोक्यात घालून गणपती विसर्जन चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळाच्यावतीने दत्ता सामंत यांच्याहस्ते हरी खोबरेकर व आतू फर्नांडिस मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन खास सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!