मालवणात उद्या ठाकरे शिवसेनेचा “निष्ठेची साठी” उपक्रम

वर्धापन दिनानिमित्त निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिकांचा होणार सन्मान : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती

मालवण : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन सोहळा उद्या शुक्रवारी १९ जून रोजी साजरा होत आहे. शिवसेनेत सध्या सुरु असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या संध्याकाळी ६ वाजता ठाकरे शिवसेनेच्या वतीने “निष्ठेची साठी” हा उपक्रम साजरा केला जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिक यांचा सत्कार केला जाणार असून शिवसेना निष्ठेचा ६० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेना- युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी ठाकरे शिवसेना शाखा मालवण येथे उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख तथा माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!