गणरायाच्या चरणी भक्तिभावाची भेट; विशाल परब यांसह भाजप नेत्यांनी घेतले श्रींचे दर्शन

सावंतवाडी : भाजप युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी भाजप सोशल मीडिया संयोजक केतन आजगावकर उपस्थित होते.

श्री गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर उपस्थितांनी मनमोकळ्या गप्पा मारत विविध विषयांवर संवाद साधला. भक्तिमय वातावरणात झालेली ही सदिच्छा भेट आपुलकीचा आणि आनंदाचा अनुभव देणारी ठरली. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांनी सुख, समृद्धी आणि जनसेवेच्या कार्यासाठी श्रींचे आशीर्वाद घेतले.

error: Content is protected !!