स्वराज्य संघटना व सकल हिंदू समाज, मालवण यांच्यावतीने आयोजन
मालवण : राजमाता जिजाऊंचे आणि दुर्गा मातेचे स्मरण करण्यासाठी मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी मालवण शहरात दुर्गा माता दौड निघणार आहे. सकाळी ७.३० वाजता रामेश्वर कॉम्प्लेक्स जवळील दुर्गा मातेकडून बंदर जेटी पर्यंत ही दौड निघणार आहे.
राजमाता जिजाऊंच्या पोटात छत्रपती असताना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करून जिजाऊनी देवीकडे एकच साकडं घातलं होते, “माझ्या पोटी अशा बालकाला जन्म दे की तो देव, देश आणि धर्माचं रक्षण करेल. दुर्गा मातेने जिजाऊंची इच्छा पूर्ण केली आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांमुळे आपण हिंदू म्हणून धार्मिक कार्यक्रम साजरे करू शकतो. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रभर दुर्गामाता दौड निघत आहे. तरी मालवण मधील सर्व स्त्री- पुरुषांनी मोठ्या संख्येने या दुर्गा माता दौडमध्ये सहभागी व्हावे. सहभागी होणार्यांनी शक्यतो सफेद कपडे परिधान करून, भगव्या रंगाची शाल किंवा ओढणी वापरावी, असे आवाहन स्वराज्य संघटना, मालवण व सकल हिंदू समाज, मालवण यांनी केले आहे.