मिलिंद नार्वेकरांचे खोचक ट्विट ; राणे समर्थकांकडून जोरदार समाचार
कुणाल मांजरेकर
सर्वोच्च न्यायालयाने भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी तीनच शब्दांत खोचक ट्विट केले आहे. “सूक्ष्म लघु दिलासा” असं ट्विट करून राणे कुटुंबियांना डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ट्विटचा राणे समर्थकांनी जोरदार समाचार घेतला आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयातही फेटाळण्यात आला. त्यांनी येत्या दहा दिवसांत न्यायालयासमोर हजर व्हावे आणि नियमित जामीन घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर याप्रकरणी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक खोचक ट्विट करत राणेंना टोला लगावला आहे. नितेश राणे याचा जामीन फेटाळल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, लघु सुक्ष्म दिलासा!. नार्वेकरांच्या या ट्विटरवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यावर अमर वारीसे नामक नेटकऱ्याने मातोश्रीचा घरगडी म्हणत टीका केलीय. तर अनिकेत मोरे याने घरगडी जरी असला तर प्रामाणिक आहेत. तुझा साहेब दर वर्षी नवीन पक्षात. आता २०२४ ला तृणमूल की द्रमुक, असा सवाल केला आहे. तर विकास पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून सरकारी पैशाने मोठे वकील देऊन नितेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितेश राणे लाचारांना पुरून उरतील. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नगरपंचायतमध्ये भकास आघाडीला धूळ चारली. आता मुंबई महापालिकेतही लाचार सेनेची हार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना टार्गेट केल्याचा आरोप केलाय. “मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात वकील दिला नाही, पण नितेश राणेंविरोधात अभिषेक मनू संघवी सारखा वकील लावला. ही आहे नितेश राणेंची ताकद..!Bmc निवडणुकीच्या तोंडावर शेनेने किती धसका घेतलाय ते यातून दिसून येत” असं ट्विटही विकास पवार यांनी केलंय. तर “कितव्या मजल्या वरून ट्विट केलंस ?” असा सवाल योगेश घाडीनी नार्वेकर यांना केलाय.