वराड पं. स. गणातून माधुरी मसुरकर तर पेंडूर पं. स. गणातून रिया बावकर यांचा विजय
मालवण | कुणाल मांजरेकर
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये घेण्यात आली. या निवडणुकीत पेंडूर जिल्हा परिषद गटात जि.प. चे माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. या ठिकाणी संतोष साटविलकर यांनी 1441 मतांनी विजय मिळवला. श्री. साटविलकर यांना 4406 तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार घन:श्याम राणे यांना 2965 मते मिळाली.
मालवण तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचाच बोलबाला दिसून आला आहे. पेंडूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या तिकिटावर संतोष साटविलकर महायुतीच्या वतीने निवडणूक लढवत होते. त्यांनी निकालात बाजी मारली आहे. तर वराड पं. स. गणातून भाजपच्या माधुरी मसुरकर यांनी उबाठाच्या दिक्षा रेवडेकर यांचा 411 मतांनी पराभव केला. मसूरकर यांना 1946 तर रेवडेकर यांना 1550 मते मिळाली. पेंडूर पं. स. गणातून शिवसेनेच्या रिया बावकर यांनी विजय मिळवला.