वादळी वारे व उंच लाटांचा सामना करत मत्स्यव्यवसायच्या गस्तीनौकेकडून दोन एलईडी ट्रॉलर्सवर कारवाई

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली अवैध एलईडी मासेमारीविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाची कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी हद्दीत अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागाला सक्त निर्देश दिले असून बुधवारी ८ एप्रिलच्या रात्री समुद्रातील वादळी वारे व उंच लाटांचा सामना करत मत्स्यव्यवसायच्या गस्तीनौकेकडून महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत देवगड आणि गोवा येथील दोन एलईडी ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात आली आहे. सध्याच्या हंगामात एलईडी मासेमारीविरुद्धची ही दहावी मोठी यशस्वी कारवाई आहे.

बुधवारी ८ एप्रिल रोजी रात्री मालवण समोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री. प्र. ला. महाडवाला, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, श्री. कि. मा. वाघमारे, परवाना अधिकारी, देवगड व श्री. ग. शं. टेमकर, परवाना अधिकारी, मालवण हे नियमित गस्त घालत होते. यावेळी देवगड येथील परवाना असलेली नौका चित्रा-१ नों. क्र.- IND-MH-५-MM-६८५ व अक्राजे (Acranje) नों. क्र.- IND-GA-१-MM-३९६२ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अनधिकृतरित्या एलईडी लाईट व्दारे मासेमारी करत असताना पकडले. या दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण अंदाजे ३५-४० खलाशी आहेत. 

सदर नौका जप्त करून देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवरील LED लाईट सामग्री जप्त करण्यात आली आहे. मागील आठवड्यात देखील गोवा आणि रत्नागिरी येथील नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्याच्या हंगामात ही LED मासेमारीविरुद्धची दहावी मोठी यशस्वी कारवाई आहे.

अंमलबजावणी अधिकारी अंमलबजावणी अधिकारी श्री. प्र. ला. महाडवाला, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, श्री. कि. मा. वाघमारे, परवाना अधिकारी, देवगड व श्री. ग. शं. टेमकर, परवाना अधिकारी, मालवण यांच्या पथकाने सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने श्री. सागर कुवेसकर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे.

error: Content is protected !!