टीजेएसबी सहकारी बँकेच्या वतीने युनेस्को मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना समर्पित असलेल्या १२ किल्ल्यांची माहिती असलेली नावीन्यपूर्ण दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे अनावरण मालवण शाखेच्या वतीने मालवणच्या नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते नुकतेच बंदर जेटी परिसरात करण्यात आले. यानिमित्ताने बँकेच्या वतीने नगराध्यक्षांसह अन्य नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
टीजेएसबी सहकारी बँक सहकारी बँकांमधील अग्रगण्य बँक असून या बँकेच्या ५ राज्यांमध्ये १६३ शाखा आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणसह ९ शाखा कार्यरत असून राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यात बँकेचे पदार्पण होत आहे. या बँकेने नवीन वर्षानिमित्त युनेस्कोच्या यादीत स्थान मिळवलेल्या १२ गडकिल्ल्यांची माहिती असलेली सचित्र दिनदर्शिका प्रसिद्द केली आहे. त्याचे अनावरण नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक दीपक पाटकर, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, गटनेत्या पूनम चव्हाण, नीना मुंबरकर, मेघा गावकर, सौ. श्रीमती यांच्यासह टीजेएसबी सहकारी बँक मालवण शाखेचे शाखा अधिकारी लवू पालयेकर, सिंधुदुर्ग विभागप्रमुख सचिन कुलकर्णी, नितीन मोरजकर व इतर सहकारी उपस्थित होते. यावेेळी नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी बँकेच्या दिनदर्शिकेच्या नावीन्यपूर्ण कल्पनेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.