कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मातृशोक

माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे यांनी केलं सांत्वन

कणकवली : कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्री लक्ष्मी अनंत नलावडे (वय- ८१, रा.कणकवली बाजारपेठ ) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मागील काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यातच सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. दुपारी कणकवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगे सुना, विवाहित मुली, जावई , नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी सकाळी समीर नलावडे यांच्या निवासस्थानी जाऊन मातोश्री लक्ष्मी नलावडे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व नलावडे कुटुंबाचे सांत्वन केले. तर सायंकाळी माजी खासदार निलेश राणे यांनी नलावडे कुटुंबियांची भेट देऊन सांत्वन केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!