वायंगणी येथे श्री संत दादा महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन
मसुरे (प्रतिनिधी) वायंगणी घाडीवाडी येथील दत्त मंदिर येथे परमपूज्य दादा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री संत दादा महाराज दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष म्हणून दामोदर साळकर, प्रकाशक सिताराम (नाना) करमळकर, वायंगणी सरपंच सौ संजना रेडकर, रुपेश अवसरे, सदानंद राणे, रामदास प्रभू , हनुमंत उर्फ सुंदर प्रभू चंद्रकांत गणेश कुबल, चंद्रकांत कावले, हरिश्चंद्र ढोलम, संदीप रेवणकर, चंदू वायंगणकर, सचिन रेडकर, आशितोष प्रभूचांदेकर, बाप्पा वायंगणकर, वायंगणी साई भजन मंडळाचे सर्व सदस्य, वायंगणी ग्रामस्थ, श्री संत दादा महाराज यांचे सर्व भक्त गण यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दादा महाराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. श्री संत दादा महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी कोरोना नियमांचे पालन करून यावेळी संपन्न झाला. मंदिर जीर्णोद्धार पूर्णत्वास येत असून यासाठी विविध मान्यवरांचा हातभार लागलेला असून या सर्वांचे यावेळी दादा महाराज भक्त गण यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक डॉ. दीपक परब यांनी दूरध्वनीवरून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.