सेवास्पर्श फाउंडेशनचे निरामय आरोग्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल…

कट्टा येथे ८ ऑगस्टला कॅन्सर जनजागृती व मोफत तपासणी महाशिबीर

मालवण : सेवास्पर्श फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ माहीम डिस्ट्रिक्ट ३१४१ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामीण रुग्णालय पेंडूर-कट्टा व जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ओम गणेश साई मंगल कार्यालय, कट्टा येथे कॅन्सर जनजागृती व मोफत तपासणी महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.

कॅन्सर हा असा आजार आहे, ज्याचे वेळीच निदान झाले तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात टाटा हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे. या शिबिरात कॅन्सरची कारणे आणि तो रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून कॅन्सर निदानासाठी आवश्यक असणाऱ्या विविध वैद्यकीय तपासण्या, टाटा हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांचे थेट समुपदेशन, रक्त तपासणी आवश्यक ते प्रमाणे CBC, RBS, LFT, Creatin, कॅन्सर मार्कर टेस्ट केल्या जातील. तसेच फायब्रोस्कॅन (FibroScan) ही यकृताच्या (Liver) आरोग्याची तपासणी करणारी एक अत्याधुनिक, आणि वेदनामुक्त वैद्यकीय चाचणी आहे. ती आवश्यकते प्रमाणे करण्यात येईल. या शिबिरात नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी शिबिरात नावनोंदणी करिता ७८७५२४११८२, ९५११८७१२५० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन अध्यक्ष, सेवास्पर्श फाऊंडेशन यांनी केले आहे.

error: Content is protected !!