मध्यरेल्वेचा उद्यापासून जम्बो मेगा ब्लॉक ; कोकण रेल्वे मार्गावरील २२ गाड्या रद्द
मुंबई : मध्यरेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामामुळे दिनांक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोंकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 22 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाच गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून सहा गाड्या मुंबई ऐवजी पनवेल येथून सोडण्यात येणार आहेत.
5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, डबलडेकर एक्सप्रेस, एलटीटी-कोचुवली सुपरफास्ट एक्सप्रेस, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, मंगलरू एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
11004 सावंतवाडी ते दादर एक्सप्रेस 3 ते 6 फेब्रुवारी पर्यंत पनवेल पर्यंत प्रवास करणार आहे. 10112 कोकणकन्या एक्सप्रेस 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पनवेल पर्यंत प्रवास करणार आहे. 12202 कोचुवली-लोकमान्य टिळक एक्सप्रेस 6 फेब्रुवारी रोजी पनवेल पर्यंत जाणार आहे. 16346 तिरुअनंतपुरम -लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान पनवेल पर्यंत प्रवास करणार आहे. 12620 मंगलरू-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान पनवेल पर्यंत प्रवास करणार आहे. तुतारी एक्सप्रेस 5 व 6 फेब्रुवारी रोजी पनवेलवरून सुटेल. कोकणकन्या एक्सप्रेसही 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पनवेलवरून सुटेल. 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरूअनंतपुरम ही गाडी 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान पनवेलवरून सुटणार आहे. 12619 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगलरू ही गाडी 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पनवेलवरून सुटेल.