प्रतीक्षा संपली ! ‘महाराज’ प्युअर व्हेज फास्ट फूड अँड रेस्टॉचा मालवणात १९ मे रोजी भव्य शुभारंभ

घाटगे ग्रुप, कोल्हापूरचे उद्योजक तेज घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

पंजाबी, चायनीज, इंडियन, साऊथ इंडियन डिशेससह पावभाजी, ज्यूस, मिल्कशेक, मॉकटेल आदी १७५ हून अधिक पदार्थांचा भरगच्च मेन्यू

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘भावेश ग्रुप ऑफ बिझनेस’ संचलित “महाराज फास्ट फूड अँड रेस्टॉ” या प्युअर व्हेज दालनाचा भव्य शुभारंभ सोहळा मालवण बाजारपेठेतील सिंधुबझार समोर मंगळवार दि. १९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता श्री सत्यनारायणाच्या महापूजेने होणार आहे.

या समारंभाला घाटगे ग्रुप कोल्हापूरचे उद्योजक तेज घाटगे, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत हे उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी चायनीज, पंजाबी, इंडियन, साऊथ इंडियन डिशेस, स्नॅक्स, सॅन्डविच, डोसा, उत्तप्पा, पावभाजी, सूप, तंदुरी, पुलाव, बिर्याणी, ज्यूस, मिल्क शेक्स, मॉकटेल यांसह सुमारे १७५ हून अधिक प्युअर व्हेज पदार्थ उपलब्ध असतील. तरी या भव्य उदघाट्न सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योजक सागर शिवाजीराव वाडकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!