नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य प्रमोद जठार ७ मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

दोन दिवसांच्या दौऱ्यात आठही तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर ७ व ८ मे रोजी ते प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात ते आठही तालुक्यांना भेटी देऊन स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे – दि. ७ मे सकाळी १० वा. दोडामार्ग भाजपा कार्यालय, सकाळी ११:३० वा. सावंतवाडी भाजपा कार्यालय, दुपारी – १ वा. वेंगुर्ला भाजपा कार्यालय, सायंकाळी – ४ वा. कुडाळ भाजपा कार्यालय, सायंकाळी -६ वा. मालवण भाजपा कार्यालय. त्यानंतर राखीव. दि. ८ मे सकाळी १०:३० वा. देवगड भाजपा कार्यालय, सकाळी ११:३० वा. पडेल भाजपा कार्यालय, दुपारी १ वा. वैभववाडी भाजपा कार्यालय, सायंकाळी ३:३० वा. कणकवली ग्रामीण भाजपा कार्यालय, सायंकाळी ५ वा. कणकवली शहर भाजपा कार्यालय, सायंकाळी ६:३० वा. तळेरे गावाच्या वतीने सत्कार.

error: Content is protected !!