उबाठा पुरस्कृत उमेदवाराची माघार ; भाजपात प्रवेश

मंत्री नितेश राणेंची ‘जादू’ : भुईबावडा पंचायत समितीत विरोधकांचे आव्हान संपुष्टात

विकासाच्या मुद्द्यावर पालकमंत्री नितेश राणे यांना विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा

वैभववाडी : भुईबावडा पंचायत समिती मतदार संघात भाजप नेते, पालकमंत्री नितेश राणे यांची ‘जादू’ पाहायला मिळाली आहे. येथील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोरे यांनी पार पडलेल्या जाहीर सभेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. नामदार नितेश राणे यांनी श्री. मोरे यांचे पक्षात स्वागत केले आहे. या निवडणुकीत उबाठाला बसलेला हा चौथा मोठा धक्का मानला जात आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिनविरोधचा फॉर्म्यूला अंमलात आणला. यात कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यात फार मोठे यश आले. आठ जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध झाले. तर १७ पंचायत समिती सदस्य बिनविरोध केल्या. याचा प्रभाव आजही निवडणुकांवर कायम आहे. भुईबावडा पंचायत समितीत उबाठा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असलेले वसंत मोरे यांनी आपली उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर करत भाजपाला पाठिंबा देत भाजप पक्षातच प्रवेश केला आहे. त्यामुळे येथील भाजप समोरील आव्हान संपुष्टात आले आहे. तालुक्यात उबाठाच्या अडचणी एकापाठोपाठ एक वाढत असल्याचे चित्र आहे. श्री. मोरे यांनी आज रीतसर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!