मालवणात मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरण मोहिमेला सुरुवात

नगरपरिषदेची कार्यवाही सुरू; नागरिकांच्या सुरक्षिततेसह श्वानसंख्या नियंत्रणावर भर

मालवण : शहरातील मोकाट श्वानांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने शुक्रवार पासून श्वान पकडणे व निर्बिजीकरणाची मोहीम सुरू केली आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेसाठी निविदा प्रक्रियेद्वारे सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, नागपूर या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. नगराध्यक्षा ममता वराडकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. शहरातील मोकाट श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपरिषदेने ही कार्यवाही हाती घेतली असून, मोहिमेदरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे. श्वान पकडणे व निर्बिजीकरणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

error: Content is protected !!