Malvan | पायाला दुखापत झालेल्या गायीला दिला सुरक्षित निवारा

नगरसेवक ललित चव्हाण, तेजस लुडबे, निकित वराडकर, श्रीराज बादेकर यांच्यासह गो सेवक व बजरंग दलाच्या युवकांचा पुढाकार ; खांबाळे येथील गो शाळेसह बाळा सादये यांचे मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

शहरात गेले अनेक दिवस पायाला दुर्धर आजार झालेली गाय बेवारसपणे फिरत होती. याची माहिती मिळताच मालवणमधील गो सेवक व बजरंग दलाच्या युवकांनी वैभववाडी खांबाळे येथील गाय वासरू गो शाळेशी संपर्क साधून या गायीची त्याठिकाणी रवानगी केली. सदरील गो शाळेत जागा उपलब्ध नव्हती. पण या गायीवर उपचार होण्याची गरज युवकांनी निदर्शनास आणून देताच त्यांच्या विनंतीस मान देत या गो शाळेने या गायीला आपल्याकडे आणण्यास होकार दर्शवला. याबद्दल गो सेवक व बजरंग दलाच्या युवकांनी गो शाळे सह बाळा सादये यांचे आभार मानले

.

मालवणमध्ये ही गाय पायाला दुखापत झालेल्या अवस्थेत बरेच दिवस फिरत होती. येथील बाळा सादये यानी या गायीला आपल्याकडे आणत तीन दिवस तिची सेवा केली. डॉक्टर आणून तिच्यावर उपचार केले. तसेच या गायीच्या मालकांनी संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, कोणीही पुढे न आल्याने गो सेवक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी खांबाळे येथील गाय वासरू गो शाळेचे प्रफुल्ल पवार यांच्याशी संपर्क करून या गायीला आपल्याकडे ठेवण्याची विनंती केली. मात्र त्यांच्याकडे जागा अपुरी असल्याने ही गाय ठेवायची कुठे हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर श्री. पवार यांना विनंती करून या गायीची परिस्थिती त्यांना सांगितली असता त्यांनी या गायीला आपल्याकडे आणण्यास सहमती दिली. अखेर बुधवारी ही गाय खांबाळे येथील गो शाळेत पाठवण्यात आली. यावेळी तेजस लुडबे, नगरसेवक ललित चव्हाण, निकित वराडकर, अनिश तळगावकर, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्रीराज बादेकर, दर्पण सादये, अनिकेत तळगावकर, आदित्य लुडबे, वैभव लुडबे, तेजस नार्वेकर, बाळा सादये आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!