चिपी – नवी मुंबई विमानसेवा सुरू होताच दीपक कपूर यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल मानले आभार

मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज मंत्रालयात पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी चिपी–नवी मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेत मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल दीपक कपूर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

गेल्या काही काळापासून बंद असलेली ही विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हवाई वाहतुकीला नवसंजीवनी मिळाली आहे. या सेवेमुळे जिल्ह्यातील नागरिक, पर्यटक तसेच व्यावसायिकांना नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाशी जलद हवाई संपर्काची सुविधा उपलब्ध झाली आहे. विमानसेवा नियमित सुरू राहिल्यास सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळण्यासोबतच व्यापार, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!