आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भरगच्च कार्यक्रम

नेत्रतपासणी, हृदयरोग, रक्त तपासणी, अपंगांना दुचाकी वाटप, महिलांसाठी खेळ पैठणीचा यांसह विविध उपक्रम

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांच्या २६ मार्चला होणाऱ्या वाढदिवसा निमित्ताने मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये मोफत नेत्रतपासणी, हृदयरोग, रक्त तपासणी, अपंगांना दुचाकी वाटप, महिलांसाठी खेळ पैठणीचा यांसह विविध उपक्रम होणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.

येथील दैवज्ञभवन येथे शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबी जोगी, मंदार केणी, दीपा शिंदे, श्‍वेता सावंत, बाळ महाभोज, महेश जावकर, मंदार ओरसकर, अंजना सामंत, पूजा तोंडवळकर, सेजल परब, पूनम चव्हाण, सन्मेष परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आमदार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ रोजी ग्रामीण रुग्णालय येथे मोफत नेत्र तपासणी, हृदयरोग, रक्त तपासणी केली जाणार आहे. याचदिवशी शिवसेना शाखा कार्यालय येथे अपंग बांधवांना दुचाकींचे वाटप करण्यात येणार आहे. महिलांसाठी दैवज्ञभवन येथे खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. मोतिबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी २६ ते ३१ मार्च या कालावधीत तालुक्यात होणार आहे. त्यानंतर ८ ते १० एप्रिल या कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. २६ तारखेला शिवसेना वायरी भुतनाथ विभागाच्यावतीने माधवबाग कणकवली यांच्यावतीने वायरी भुतनाथ शाळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. तर कट्टा येथे युवासेनेच्यावतीने डबलबारीचेही आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर शहरात प्रत्येक प्रभागात शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना मोफत जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहितीही श्री. खोबरेकर यांनी दिली. शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी शिवसेना शाखा कार्यालय भरड- दत्ता पोईपकर (९४०५६१९८७१) यांच्याकडे नावनोंदणी करावी असे आवाहन केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!