आ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ६१ जणांचे रक्तदान

शिवसेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजन

मालवण : कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शिवसेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली.नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगरसेविका निना मुंबरकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, मेघा गावकर, शिवसेना पदाधिकारी राजा गावकर, बबन शिंदे, प्रसाद आडवणकर, बाळू नाटेकर, राजू बिड्ये, भाई मांजरेकर, यशवंत गांवकर, सूर्यकांत फणसेकर, परशुराम पाटकर, अभय कदम, शेखर गाड, महेश सारंग, मोहन वराडकर, निषय पालेकर, स्नेहल पराडकर, महिमा मयेकर, आनंद खवणेकर, नितेश पेडणेकर, विहार कोदे, तेजस लुडबे यासह अन्य पदाधिकारी, रक्तदाते, जिल्हा रुग्णालय ओरोस येथील वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!