भाजपच्या वतीने आयोजित ई श्रम कार्ड शिबिराचा १२० जणांनी घेतला लाभ

भाजयुमो मालवण आणि माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा संयुक्त उपक्रम

कुणाल मांजरेकर

मालवण : भारतीय जनता युवा मोर्चा मालवण आणि माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भाजपच्या कार्यालयात आयोजित ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभरात १२० जणांनी यावेळी नोंदणी केली.

शिबिराचे उद्घाटन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आबा हडकर आणि भाजपचे सुकळवाड शक्ती केंद्र प्रमुख विजय निकम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहरअध्यक्ष ललित चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, मोहन वराडकर, राजू बिडये, भाई मांजरेकर, दुर्गेश गावकर, अभय कदम, निकीत वराडकर, पंकज गावडे, जॉमी ब्रिटो, आनंद तळाशिलकर आदी उपस्थित होते. शिबिरात नागरिकांच्या ई श्रम नोंदणीसाठी गुरुनाथ माने व कृष्णा साळसकर यांच्यामार्फत कृपा मयेकर, कामाक्षी शिंदे, नेहा खोत, अक्षता गोसावी यांचे सहकार्य लाभले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!