सुप्रिया सुळेंकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी ; अस्वच्छता पाहून भडकल्या

किल्ल्यावर एकही स्वच्छतागृह नाही ; महिला पर्यटकांची सुप्रिया ताईंकडे तक्रार

कुणाल मांजरेकर

मालवण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी किल्ल्यातील अस्वच्छता आणि मंदिराच्या दुरावस्थेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत आपण स्वतः राज्य आणि केंद्र सरकारसोबत बोलून पाठपुरावा करू, असे त्या म्हणाल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डाँटस, माजी मंत्री प्रवीण भोसले, अर्चना घारे, अबिद नाईक, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, प्रमोद कांडरकर, पं. स. सदस्य विनोद आळवे, उद्योजक सतीश आचरेकर, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, पुंडलिक दळवी, सदप खटखटे, बाबू डायस, सौ. ज्योती तोरस्कर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी किल्ल्यावरील अस्वछतेची पाहणी करून नाराजी व्यक्त केली. तसेच येथील कचऱ्याचे त्यांनी फोटोग्राफ घेण्याची सूचना देखील त्यांनी आपल्या सोबत आलेल्या फोटोग्राफरला केली. यावेळी किल्ल्यावर एकही स्वच्छता गृह नसल्या बाबत येथे आलेल्या महिला पर्यटकांनी सुप्रिया ताईंकडे तक्रार केली. त्यावर याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही करू, असे त्या म्हणाल्या.

जय गणेश मंदिराला भेट

खासदार सुप्रिया सुळे आज मालवण दौऱ्यावर आल्या आहेत. प्रारंभी, ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी स्थापन केलेल्या मेढा येथील जय गणेश मंदिराला त्यांनी भेट देऊन श्री गणरायाचे विधीवत दर्शन घेतले. यावेळी जयंतराव साळगावकर यांनी अत्यंत कलाकुसरीने शास्त्रोक्त निर्माण केलेल्या मंदिराच्या बांधकामा बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!