नितेश राणेंच्या संकल्पनेतून चाकरमान्यांसाठी पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना

दादरहून पहिली ट्रेन रवाना; गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादर ते सावंतवाडी अशी मोदी एक्सप्रेस आज दुपारी १२ वाजता दादर रेल्वे स्थानकातून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली. मंत्री नितेश राणे यांनी दादर स्थानकावर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. आरक्षणाची मर्यादित उपलब्धता आणि वाढती प्रवासी संख्या यामुळे अनेक चाकरमान्यांना प्रवासाचे नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवाशांना मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दादर स्थानकावर ट्रेन रवाना होत असताना गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. बाप्पाच्या जयघोषात प्रवाशांनी कोकणाकडे प्रस्थान केले.गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना कोकणात पोहोचण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाही त्याअंतर्गत दोन विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली असून, दुसरी मोदी एक्सप्रेस रविवार, १३ सप्टेंबर रोजी रवाना होणार आहे.पहिल्या ट्रेनला मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना या सुविधेमुळे प्रवासात दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!