युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
मालवण शहरातील प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य, मास्क व खाऊ वाटप
कुणाल मांजरेकर
मालवण : युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मुलांना शैक्षणिक साहित्य, मास्क व खाऊ वाटप करण्यात आले.
रेवतळे प्राथमिक शाळा, धुरीवाडा प्राथमिक शाळा, देऊळवाडा प्राथमिक शाळा, दांडी प्राथमिक शाळा, रोझरी प्राथमिक शाळा आणि तालुका स्कुल मालवण येथे विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात आले.
युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर यांचा वाढदिवस ८ डिसेंबर रोजी आहे. मात्र तत्पूर्वीच सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेविका सेजल परब, उमेश मांजरेकर, भाई कासवकर, अमेय देसाई, किसन मांजरेकर, रेवतळे युवा सेना शाखाप्रमुख सिद्धेश मांजरेकर, विघ्नेश मांजरेकर, अविनाश मांजरेकर, नितीन हडकर, शुभम लुडबे, राजा मांजरेकर, अस्मित चव्हाण, सचिन कांबळी, बाबा नामनाईक यासह शाळा मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
कोरोना कालावधीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांना वह्या, दप्तर, पेन, आदी शैक्षणिक साहित्य तसेच मास्क व खाऊ वाटप मंदार ओरसकर यांनी केले. याबाबत शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षकांनी आभार मानले आहेत.