रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; YBITमध्ये ४१ युनिट रक्त संकलित

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (YBIT), सावंतवाडी येथील डिग्री विभागात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या पुढाकाराने नुकतेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमातून एकूण ४१ युनिट रक्त संकलित करण्यात आले. प्रत्येक रक्तपिशवीत ३५० मिली रक्त संकलित करण्यात आले असून, हे रक्त गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमण बाणे, प्रा. डॉ. विश्राम सावंत, प्रा. वरुण महाबळ, प्रा. रोशन आचरेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथील रक्तपेढीचे कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.

रक्तदान हे केवळ गरजू व्यक्तीला जीवनदान देणारे कार्य नसून, समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी अधोरेखित करणारा उपक्रम आहे. YBITमधील या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता आणि सेवाभाव वाढीस लागण्यास मदत झाली.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचे NSS विभागाच्या वतीने आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!