आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने कुडाळ, मालवण मतदार संघात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली खा. नारायण राणेंचे जुने सहकारी पुन्हा एकसंघ


मालवण | कुणाल मांजरेकर
आमदार निलेश राणे यांचे झंझावाती नेतृत्व आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची समर्थ साथ यामुळे मालवण तालुक्यात उबाठा गटाला दररोज धक्क्यावर धक्के मिळत आहेत. शनिवारी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरामवाडी येथील उबाठा मालवण उपतालुकाप्रमुख तथा माजी जिल्हापरिषद सभापती बाळ महाभोज यांसह गुरामवाडी, नांदोस, वराड येथील उबाठा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. कोकणचे आधारस्तंभ खासदार नारायण राणे यांच्या सोबत १९९० पासून काम केलेले अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार निलेश राणे यांच्या विकास कामांच्या धडाक्याने पुन्हा एकसंघ होत असल्याचे यानिमित्ताने प्रामुख्याने दिसून आले आहे.
आमदार निलेश राणे यांनी गेल्या दहा महिन्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन व गाव विकासाचा दृष्टिकोन ठेवून शिवसेनेत पक्ष करत असल्याचे प्रवेशकर्ते यांनी सांगितले. सोबतच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे सातत्याने गावागावातील जनतेच्या संपर्कात असणारे नेतृत्व आहे. त्यांच्याकडे प्रश्न मांडला की तो प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागतो. विकासकामे पुर्ण होतात. याचं कार्य पद्धतीवर प्रेरित होऊन पक्ष प्रवेश करतं असल्याचे प्रवेशकर्ते यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, जि. प. माजी सभापती संतोष साटविलकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, पेंडूर जि. प. विभाग प्रमुख राजन माणगांवकर, वराड शिवसेना गांवप्रमुख बबन पांचाळ, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, संतोष पालव, महेश बागवे, सुशांत घाडीगावकर, दिलीप बिरमोळे, वायरी विभागप्रमुख मंदार लुडबे, शानू वालावलकर यांसह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Subscribe to my channel




