भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त १२ ते १५ ऑक्टोबरला “विशाल सप्ताह”

माजी खा. निलेश राणेंसह “काय झाडी काय डोंगर” फेम शहाजी बापू पाटील यांची उपस्थिती

प्रख्यात गायक अजित कडकडे यांच्या मैफिलीसह रंगारंग कार्यक्रम ; वेंगुर्ल्यात १२ ऑक्टोबरला शरीरसौष्ठव स्पर्धा

कुडाळ : भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन गौरव सोहळा भाजपच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विशाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ऑक्टोबरला भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह “काय झाडी, काय डोंगर” फेम शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रमुख प्रख्यात राहणार आहेत. याच दिवशी प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांच्यासह अनेक संगीतमय, पोवाडा, शाहीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, याबाबतची माहिती भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी कुडाळ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

भाजपाचे युवा नेते, उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा 15 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात विविध शैक्षणिक आणि समाजपयोगी उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे. या बाबतची भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊसवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, बाळू देसाई, बाबली वायंगणकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यासंदर्भात बोलताना दादा साईल म्हणाले 12 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 7 वाजता जिल्हास्तरीय विशाल श्री शरीरसौष्ठव स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे आकर्षक बॉडी बिल्डर प्रदर्शन मधुसूदन कालेलकर सभागृह, वेंगुर्ला येथे होणार आहे. तर 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता बुवा गुंडू सावंत विरुद्ध बुवा संदीप लोके यांच्यात महाडबलबारी सामना ओवेस कॉम्प्लेक्स, कट्टा कॉर्नर, बांदा येथे होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता कै. श्रावण धुरी यांच्या स्मरणार्थ केसरकर हॉल माणगाव, तिठा येथे महाआरोग्य शिबिर आणि चष्मा वाटप होणार आहे. तसेच 14 ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप सावंतवाडी तालुक्यातील शाळांत होणार आहे.

15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 ते 7.30 वाजता संगीतकार अजित कडकडे यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. रात्री 7.30 ते 8.15 वा. युवा नेतृत्व विशाल परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे. 8.15 ते 8.30/पांढरी काठी दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा सत्कार सोहळा होणार आहे. 8.30 ते 10 वाजता सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार चैतन्य महाराज यांचा कीर्तन सोहळा होणार आहे. तर रात्रौ 10 ते 12 वाजता सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगाले यांचा पोवाडा होणार आहे.15 ऑक्टोबर चे हे सर्व कार्यक्रम कुडाळ नवीन एसटी स्टँड जवळ होणार आहेत. तरी या कार्यक्रमाना उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल परब मित्रमंडळ सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3584

Leave a Reply

error: Content is protected !!