बबन शिंदे, राजा गांवकर यांच्यावर शिवसेनेकडून नव्या जबाबदाऱ्या

बबन शिंदे यांची उपजिल्हाप्रमुख तथा कणकवली विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी नियुक्ती तर राजा गावकर यांच्याकडे शिवसेना मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा शिवसेना जिल्हाप्रवक्ते पदाची धुरा 

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र

मालवण : शिवसेनेचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे आणि माजी तालुकाप्रमुख राजा गावकर यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शना खाली नव्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यानुसार बबन शिंदे यांची उपजिल्हाप्रमुख तथा कणकवली विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून राजा गावकर यांच्याकडे शिवसेना मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा शिवसेना जिल्हाप्रवक्ते पदाची धुरा देण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले.

यावेळी जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शिवसेना सरपंच संघटना तालुका प्रमुख शाम वाक्कर, शहरप्रमुख दिपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, अरुण तोडणकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!